असा असतो हा #खोकड

Votre vidéo commence dans 20
Passer (5)
easy way to earn bitcoin

Merci ! Partagez avec vos amis !

Vous avez aimé cette vidéo, merci de votre vote !

Ajoutées by admin
50 Vues
सोमेश्र्वर बहुद्देशीय संस्था, वैराग (रजि. नं. एफ. २६७४०, सोलापूर) ता. बार्शी अंतर्गत ऍनिमल फ्रेंड्स, बार्शी ही स्वयंचलित संस्था वन्य जीवांसाठी कार्यरत असणारी सेवाभावी संस्था व मित्रांचा गट २००५ पासून काम करत आहे. यादरम्यान असंख्य प्रकारचे जखमी वन्यजीव (साप, मुंगूस, कासव, उदमांजर, विविध पक्षी, सस्तन प्राणी जसे कि जखमी कुत्रे, गाढव, मांजर, गाय इत्यादी) योग्य देखभाल घेऊन नीट केले आहेत आणि त्यांना निसर्गाच्या स्वाधीन केलेले आहे. त्याच बरोबर ऋतु बदलामुळे सरपटणारे प्राणी लोकांच्या घरांमध्ये किंवा परिसरामध्ये दिसून आल्यास ऍनिमल फ्रेंड्स, बार्शी संस्थेने त्या प्राण्यांना लोकांच्या घरांमधून किंवा परिसरांमधून सुखरूप बाहेर काढले आहे आणि निसर्गाच्या सान्निध्यात सोडले आहे.
संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे "भूतदया हीच ईश्वर सेवा" मानून आम्ही आमचे काम असेच निरंतर चालू ठेवणार आहोत.
बार्शीतील खोकड
मराठी विश्वकोश माहितीनुसार...
#बार्शी
खोकड हा सस्तन प्राणी मांसाहारी गणाच्या कॅनिडी कुलातील आहे. या कुलात कुत्रा, लांडगा, कोल्हा, वन्य कुत्रा, इ. प्राणी येतात. खोकड हा प्राणी कोकरी, लोमडी, छोटा कोल्हा व इंडियन फॉक्स अशाही नावांनी ओळखला जातो. भारतात हिमालयाच्या पायथ्यापासून कन्याकुमारीपर्यंत तो सर्वत्र आढळतो. प्रामुख्याने माळरानावर, खुरट्या झुडपांच्या वनात, शेतात, कालव्यांच्या आसपास त्यांचे अस्तित्व असते. भारतात सर्वत्र आढळणार्‍या खोकडाचे शास्त्रीय नाव व्हल्पिस बेंगॉलेन्सिस आहे.

खोकड हा कोल्ह्यापेक्षा आकाराने लहान असतो. त्याच्या शरीराची लांबी डोक्यासकट ४५ ते ६० सेंमी. असते. शेपूट २५ ते ३५ सेंमी. लांब असते. वजन १.५ ते ७ किग्रॅ. असते. खोकड आकाराने लहान व सडपातळ असून पाय वारीक आणि लांबट असतात. शरीराचा रंग करडा किंवा राखाडी असतो. डोके, मान आणि कानामागची बाजू पुसट काळसर तर शेपटीचे टोक काळे असते. पायांचा रंग मातकट लालसर असतो. हिवाळ्यात उत्तर भारतातील खोकडांना दाट केस येतात. त्यामुळे त्यांचे थंडीपासून संरक्षण होते.

खोकड जमिनीमध्ये ६०-९० सेंमी. खोलीवर बिळे खोदतात. बिळाला जमिनीच्या दिशेनी ३-४ वाटा असतात. संकटकाळी या वाटांचा त्याला उपयोग होतो. बिळ लांबलचक असून त्यात बरीच जागा असते. दिवसा उन्हाच्या वेळी ते या जागी आराम करतात आणि संध्याकाळी भक्ष्याच्या शोधार्थ बाहेर पडतात. अंधार दाटून आल्यानंतर कोल्ह्याप्रमाणे तेही एकत्र जमून सारखेच ओरडतात. त्यांचे प्रमुख खाद्य उंदीर, घुशी, सरपटणारे प्राणी, खेकडे, कीटक इ. असते. कलिंगडे, बोरे, हरभर्‍याचे घाटेदेखील ते खातात. हा प्राणी मनुष्य वस्तीच्या आसपास राहणारा असला तरी कोंबड्या वगैरे पळवीत नाही. उलट तो उंदीर, घुशी, शेतातील खेकडे खात असतो; त्यामुळे अशा प्राण्यांच्या उपद्रवापासून शेतीचे रक्षण होऊन शेतकर्‍यांना मदतच होते. पावसाळ्यात पांढर्‍या मुंग्या आणि वाळवीदेखील खातो.

शत्रूपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तो पळताना आपल्या पायांचा चपळाईने वापर करतो. चटकन वळताना तोल सांभाळण्यासाठी त्याला शेपटीचा उपयोग होतो.

खोकडांची पिल्ले हिवाळ्यात जन्माला येतात. एका वेळेस जन्माला येणार्‍या पिल्लांची संख्या चार असते. मादीच्या गर्भधारणेचा काळ सु. ५३ दिवसांचा असतो. नर आणि मादी दोघेही पिल्लांची काळजी घेतात. पिल्ले लहान असताना त्यांना बिळातच लपवून ठेवले जाते.

हिमालयाच्या काही भागांत एका वेगळ्या जातीचा खोकड आढळतो. तो तांबडा असतो. या खोकडाच्या शेपटीचे टोक पांढरे असते. त्याचे शास्त्रीय नाव व्हल्पिस व्हल्पिस आहे.
आमच्या या कार्यासाठी संस्थेस मदत करायची असेल तर

8087872063 या नंबर वर
Phone Pay
Google Pay करू शकता.


#Background music using to download #YouTube library
#snake
#howtocatch
#cobra
#Russelviper
#barshi
#wild
#wildlife
#wildsnake
#discovery
#animalplanet
#maharashtra
#नाग
#कसापकडला
#nagmani
#wildlifeofmaharashtra
#mahrashtra
#pune
#farm
#stayhome
#viper
#kingcobra
#snakebite
#saferesque
#howtoresquesnake
#snakefreiday
#sankecachter
#youtube
#snakesofindia
#sankesofmaharashtra
#vinesnake
#sawviper #bandedkrait
#wolfsnake #venomoussnake
#nonvenomoussnake
#very
#deadlysnake
#jarurdekhe
#yakinnahikaroge
#yenahidekhatokuchnahidekha
#bitereaction
#trinket.
#racersnake
#blackcobra
#travling
#herping
#jungle
#adventure
#grassnake
Catégories
MAMMALS
Mots-clés
अजगर, धामण, तस्कर

Ajouter un commentaire

Commentaires

Soyez le premier à commenter cette vidéo.